शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 मार्च 2021 (08:15 IST)

पतीला ठार मारण्याची धमकी देत नराधमाने केला बलात्कार

Naradhama
पतीला मारून टाकण्याची धमकी देत एकाने विवाहितेवर वारंवार बलात्कार केल्याची घटना नाशिकमध्ये उघड झाली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी ख्रिश्चनवाडी, कॅनडा कॉर्नर येथील संशयित पॉली शांतवन जाधव (वय ३०) यास अटक केली आहे.
 
पोलिसांच्या माहितीनुसार, तुझ्या पतीला मारून टाकील अशी धमकी संशयिताने पीडितेला दिली. त्याने जानेवारी २०१९ ते २० मार्च २०२१ या कालावधीत कॅनडा कॉर्नर येथील सार्वजनिक शौचालयाजवळील पडीक खोलीत मारहाण करत वारंवार बलात्कार केला. त्यातून पीडित महिला दीड महिन्याची गर्भवती राहिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गायकवाड करत आहेत.