शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (08:38 IST)

नारायण राणे कृपया लवकर बरे व्हा

Manisha Kayande
नारायण राणे यांनी  पत्रकारपरिषदेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी ”मला मारण्यासाठी शकील, छोटा राजन यांना उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती”, असा आरोप केला. त्याला शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“नारायण राणे यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांची जी अवस्था झाली होती. ते बघून मी एवढंच म्हणेल, नारायण राणे कृपया लवकर बरे व्हा”, अशी प्रतिक्रिया मनिषा कायंदे यांनी दिली.
काय म्हणाले होते नारायण राणे?
नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. “मला मारण्यासाठी शकील, छोटा राजन यांना सुपारी दिली होती. काय झालं मारलं का कोणी? मी जिवंत आहे. मी तुम्हाला पुरून उरेन. आता तुम्ही एकनाथ शिंदेवर बोलताय, काय तर म्हणे पदं दिली. उपकार नाही केले. ही शिवसेना वाढवली कोणी, टिकवली कोणी, सत्तेपर्यंत आणली कोणी? केवळ शिवसैनिकांनीच”, असा आरोप नारायण यांनी केला होता.

Edited by : Ratnadeep Ranshoor