गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 जानेवारी 2019 (09:08 IST)

नर्मदेत प्रवासी बोट उलटली पाच ठार, ४० पेक्षा अधिक वाचवले

Narmada
नर्मदा नदीमध्ये प्रवासी बोट उलटली आहे. या बोटीमधून ६६ जण प्रवास करत होते अशी माहिती समोर येत आहे. धाडगाव तालुक्यातल्या भुसा पाईंटजवळ ही घटना घडली आहे. यामध्ये ४२ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. इतर जण बुडाले असून त्यांचा शोध सुरु आहे. क्षमतेपेक्षा अधिक जण बोटीत बसल्यामुळे ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे.  या बोट दुर्घटनेमध्ये ५ जणांचा बुडून मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.या घटनेत मरण पावलेल्यांमध्ये दोन लहान मुले, एक बालक, एक तरुण आणि एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. ही दुर्घटना महाराष्ट्र हद्दीतील धडगाव तालुक्यात भूषा या गावाजवळील नर्मदा नदीच्या पात्रात घडली. या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. सर्व प्रवासी महाराष्ट्रातील आहेत. या घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी तातडीने धावून गेले.  भूषा येथे मकरसंक्रांतीनिमित्त नर्मदा नदीपात्रात अंघोळ करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. मंगळवारीही भाविकांची गर्दी झाली होती.