बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 फेब्रुवारी 2024 (09:49 IST)

नाशिक : गंगापूर शिवारात अज्ञात तरुणाचा धारदार शस्त्र भोसकून खून

murder
गंगापूर रोडवरील मोकळ्या जागेत अज्ञात तरुणाच्या छातीत धारदार शस्त्राने भोसकून त्याचा निर्घृण खून केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात एका आठवड्यात चार जणांच्या खूनाच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गंगापूर-धृवनगर लिंकरोडवरील पाटील वाडा मिसळ परिसरात असलेल्या एका निर्जनस्थळी झाडाच्या आडोशाला एका 30 ते 35 वयोगटातील तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या तरुणाच्या छातीवर, पोटावर धारदार शस्त्राने अज्ञात व्यक्तींनी भोसकून खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
 
याबाबत माहिती मिळताच पोलीस अधिकारी हनुमान कोरडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.

Edited By -Ratnadeep Ranshoor