रविवार, 22 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 ऑगस्ट 2023 (21:52 IST)

नाशिक : लाचखोर तहसीलदारच्या घरी सापडले तब्बल ४० ताेळे साेने, २० ताेळे चांदी

मुरूम उत्खननात अाकारलेला सव्वा काेटी दंड कमी करण्याच्या माेबदल्यात १५ लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने रंगेहाथ पकडले आहे. आता  नाशिकचा तहसीलदार नरेश बहिरमच्या घर झडतीत  तब्बल ४० ताेळे साेने, २० ताेळे चांदी तर ४ लाख ८० हजाराची राेकड सापडली.
 
बाजारभावानुसार सोने २४ लाखांचे असून त्याच्या नाशिकसह इतर ठिकाणी असलेल्या प्लाॅट, जमिनी व विविध बँकांमधील लाॅकरची माहिती हाती लागले अाहे. दरम्यान, बहिरमला न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि. ८) पोलिस काेठडी सुनावली आहे. सरकारचा महसूल सप्ताह सुरू असतानाच बहिरम लाच घेताना सापडला. महामार्गालगत राजुर बहुला येथे एका जमिनीमध्ये मुरूम उत्खनन केले जात आहे. नियमानुसार एकूण १ कोटी २५ लाख ६ हजार २२० रुपये दंडाची नोटीस तहसील कार्यालयाने जागा मालकास दिली. दंड कमी करण्यासाठी बहिरमने जागा मालकाच्या प्रतिनिधीकडे २५ लाखांची मागणी केली.

Edited By - Ratnadeep Ranshoor