सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (07:48 IST)

नाशिक बस आग अपघात – या ८ मृतांची ओळख पटली, ४ मृतांची डीएनए टेस्ट होणार

nashik
नाशिक  – औरंगाबादरोडवर झालेल्या खासगी ट्रॅव्हल बसच्या भीषण अपघातातील ८ मृतांची ओळख अखेर पटली आहे. या अपघातात एकूण १२ जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत ४ प्रवाशांची ओळख पटत नसल्याने त्यांची डीएनए टेस्ट करण्ाचा निर्णय घेण्यात आला आहे. १२ पैकी ३ मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली आहे.
मुंबईहून यवतमाळला जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सचा बसला नाशिक शहरात ट्रॅकने जोरदार धडक दिली. यामुळे बसची डिझेल टाकी फुटली आणि बसने पेट घेतला. पाहता पाहता संपूर्ण बस आगीमध्ये जळत होती. या बसमध्ये एकूण ५३ प्रवासी होते. यातील १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, ३८ जण जखमी आहेत. जखमींवर सिव्हिल हॉस्पिटल आणि काही खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताची दखल मुख्यमंत्र्यांनीही घेतली. त्यामुळेच त्यांनी तातडीने नाशिक गाठत अपघातस्थळाची पाहणी केली. जखमींचीही विचारपूस केली. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी बस चालक आणि ट्रक चालक दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक चालकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ज्या ८ मृतांची ओळख पटली आहे त्यामध्ये उद्धव पंढरी भिलंग (४४, रा. तारोडी, ता. माळेगाव, जि. वाशिम), कल्याणी आकाश मुळोधकर (३, रा. विधी, त. लोणार, जि. बुलडाणा), शंकर मोहन कुचनकर (१८, रा. मारेगाव मागारु, ता. वणी, जि. यवतमाळ), साहिल जितेंद्र चंद्रशंकर (१५, सावली, ता. माळेगाव, जि. वाशिम), पार्वती नागराव मुधोळकर (४५, रा. विधी, ता. लोणार, जि बुलडाणा), वैभव वामन भिलंग (२३, रा. तारोडी, ता माळेगाव जि वाशिम), ब्रह्मदत्त सोगाजी मनवर (४०, वसंत नगर पोहरादेवी, ता मानोरी, जि वाशिम), अशोक सोपान बनसोड (३५, मु बेळखेडा, ता रिसोड जि वाशिम) यांचा समावेश आहे. अद्यापही ४ मृतांची ओळख पटलेली नाही. त्यामुळे त्यांची डीएनए टेस्ट केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor