मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जुलै 2023 (20:20 IST)

नाशिक: गड, किल्ल्यांवर मद्यसेवनाचे गैरवर्तन केल्यास होणार कायदेशीर कारवाई

jail
महाराष्ट्रातील गड, किल्ले हे राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यांचे पावित्र्य राखणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. अशा पुरातन वास्तूंच्या ठिकाणी कोणी इसम मद्यसेवन करून गैरशिस्तीने वागल्याचे आढळून आल्यास महराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे नाशिकचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी कळविले आहे.
 
उपरोक्त कायद्यान्वये पहिल्या अपराधास 6 महिन्यांपर्यंत सश्रम कारावासाची आणि रूपये 10 हजार पर्यंत दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. त्यानंतरच्या अपराधास वाढीव शिक्षेची तरतूद आहे.
 
गड, किल्ले या ठिकाणी व्यक्ती मद्यसेवन करून गैरशिस्तीने वागतांना आढळल्यास नागरिकांनी नाशिक अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या 0253-2581033 या दूरध्वनी क्रमाकांवर तसेच आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाच्या 18002339999 या टोल फ्री क्रमांकावर व 8422001133 या व्हॉट्ॲप क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक श्री. गर्जे यांनी केले आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor