शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मे 2023 (20:47 IST)

नाशिक : उपचारासाठीचा केसपेपर काढताना जातीचा उल्लेख, रकाना वगळण्याची मागणी

tanaji sawant
नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णांवर उपचारासाठीचा केसपेपर काढताना आपल्या जातीचा उल्लेख करावा लागत आहे. यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जोरदार आक्षेप घेतला असून यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना पत्र पाठवत हा जातीचा रकाना त्वरित वगळावा अशी मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
 
नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात गोरगरिबांवर-वंचितांवर माफक दरात उपचार होत असतात, मात्र जर हे उपचार हवे असतील तर आपल्याला या रुग्णालयातील काही बाबी पूर्ण कराव्या लागतात, त्यात सर्वप्रथम म्हणजे रुग्णाच्या नावाने केस पेपर फाडणे, आणि याच केस पेपरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या केस पेपरमध्ये एका रकान्यात जात विचारण्यात आली आहे.
 
यावर आता नाशिक अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जोरदार आक्षेप घेतला असून या संदर्भात राज्याच्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना पत्र पाठवणार असल्याचे समितीने म्हटले आहे. हा प्रकार फक्त नाशिकमध्ये नसून तर राज्यभर सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जातीचा हा रकाना त्वरित वगळावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून होत आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor