बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (18:58 IST)

नाशिकमध्ये तलावात बुडवून विद्यार्थ्याची हत्या

नाशिकमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मारामारीमध्ये एका विद्यार्थ्याला प्राण गमवावे लागले. वाद मिटवण्याचा प्रयत्न सुरु असताना तो पुन्हा उफाळून आला आणि त्याचं पर्यवसन जबर हाणामारीत झालं. मारामारी करताना दोघं जण तलावात पडले आणि यावेळी एका विद्यार्थ्याची पाण्यात बुडवून हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. हाणामारीच्या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे.
 
शालेय विद्यार्थ्यांमधील वाढत्या हिंसाचाराची दुसरी घटना आठवड्याभरात समोर आली आहे. शाळकरी मुलांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाची हत्या करण्यात आली. तलावात बुडवून केलेल्या बेदम मारहाणीत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.