मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 सप्टेंबर 2023 (21:09 IST)

नाशिक : पतीवर संशय, दोन महिला भिडल्या; पोलीस ठाण्यातच फ्री स्टाईल हाणामारी

Nashik Police
नाशिक : पोलीस ठाण्याच्या आवारात दोन महिलांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाल्याची घटना नाशिक मध्ये घडली आहे. पोलीस ठाण्यातच महिलांचा राडा झाल्याने या घटनेची चर्चा शहरभर वाऱ्यासारखी पसरली आणि महिलांमध्ये हाणामारी झाल्याची चर्चा रंगू लागली.

परस्पर विरोधी तक्रार करण्यासाठी या महिला पोलीस ठाण्यात आल्या होत्या यावेळी यांच्यात वाद झाला वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि थेट पोलीस ठाण्यातच पोलिसांसमोरच हाणामारी झाली.
या दोन्ही महिला परस्पर विरोधी तक्रार करण्यासाठी नाशिक रोड पोलीस ठाण्यात आल्या होत्या. पतीच्या अनैतिक संबंधाचे कारणावरून दोन्ही महिलांमध्येही हाणामारी झाली.

यावेळी पोलीस ठाण्यात असल्याचं भान न राखता त्या पोलीस ठाण्याच्या आवारातच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोरच आपापसात भिडल्या. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात मोठा गोंधळ निर्माण झाला. दोघींनीही एकमेकांचे केस जोरदार ओढत एकमेकींना मारण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.

महिला असल्याने त्यांनी पोलीस ठाण्यातून महिला पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावलं. महिला पोलीस कर्मचारी त्यांच्यातील भांडण सोडवण्यासाठी आल्या असता त्या दोन्ही महिला पोलिसांना देखील जुमावण्यास तयार नव्हत्या अखेर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करत त्यांच्यातील हाणामारी रोखली. पोलीस ठाण्याच्या आवारातच हाणामारी होत असलेल्या महिलांचे भांडण रोखण्यासाठी पोलिसांना देखील कसरत करावी लागली.

दरम्यान, पोलीस ठाण्याच्या आवारात सुरू असलेल्या या संपूर्ण प्रकाराने एकच गोंधळ निर्माण झाला. यावेळी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या नागरिकांसह पोलीसही फ्री स्टाईल हाणामारी पाहून गोंधळात पडले. या दोन्ही भांडण करणाऱ्या महिलांविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor