मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 फेब्रुवारी 2024 (10:31 IST)

नाशिक :मॅनेजरने एका महिलेच्या सहाय्याने केली कंपनीची सव्वा कोटीची फसवणूक

The manager cheated the company of half a crore with the help of a woman
नोकरीस असताना खोटी कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे भासवून कायदेशीर रकमेची अफरातफर करून विविध मार्गांनी कंपनीची 1 कोटी 6 लाख रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला या आनंदवल्लीतील पाईपलाईन रोड येथे असलेल्या खत बनविण्याच्या कंपनीच्या संचालिका आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी विवेक सुरेश मुंजवाडकर व अश्विनी बिडकर हे दोघेही न्यूकेम सनरेशिया कंपनीत कामाला होते.
 
त्यांनी आपापसात संगनमत करून सन 2010 ते दि. 10 जुलै 2023 या कालावधीत कंपनीत काम करीत असताना खोटी कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे भासविले. त्यांनी परस्पर माल संबंधितांना न देता तो इतरांना विकून ते पैसे लाटले.
 
त्यानंतर कंपनीला प्राप्त होणाऱ्या कायदेशीर रकमेची मोठ्या प्रमाणात अफरातफर करून विविध मार्गांनी कंपनीची 1 कोटी 6 लाख 78 हजार 601 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही बाब कंपनी व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात विवेक मुंजवाडकर व अश्विनी बिडकर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor