शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (09:12 IST)

नाशिक हादरलं ! तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

नाशिक -कळवण राज्य महामार्गाजवळ सार्वजनिक वाचनालय जवळ झुडपांमध्ये एका तरुणाचा प्रेत आढळला .या तरुणाची हत्या दगडाने ठेचून केली आहे. मयत तरुणाची ओळख दीपक जनार्दन जाधव अशी पटली आहे. दीपक हा नाशिकात दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरीचा रहिवासी होता. दीपक ची अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून हत्या करून प्रेत झुडपांमध्ये फेकून दिले. हत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही . या घटनेमुळे नाशिकात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनास पाठविले आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहे.