मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 21 नोव्हेंबर 2021 (10:05 IST)

नवाब मलिकांच्या कन्येचं ट्वीट, वानखेडेंच्या विवाह दाखल्याची माहिती

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. या विवाहाबाबतचे अर्धसत्य लोकांना माहीत होतं, आता मी पूर्ण सत्य सांगत आहे, असं सांगत सना यांनी समीर वानखेडे यांच्या विवाहाचा कथित दाखला ट्विट केला आहे.
या कथित दाखला म्हणजे समीर वानखेडे आणि शबाना कुरेशी यांच्या विवाह झाल्याचा दाखला असल्याचे सना यांनी दाखवून दिले आहे. या दाखल्यावर समीर वानखेडे यांचे नाव समीर दाऊद वानखेडे असे लिहिलेले आढळते. तसेच हा दाखला 26 डिसेंबर 2006 रोजी जारी करण्यात आल्याचे यावर दिसत आहे.
या पूर्वी समीर वानखेडे यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या निमंत्रण पत्रिकेवर देखील समीर दाऊद वानखेडे असे नमूद केलेले दिसत होते.आता सना यांनी त्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेनंतर लग्नाचा दाखला आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट केला आहे.