testwebdunia1
Widgets Magazine
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कर्जमाफी ही सरकारची जबाबदारी; उपकार नाही - धोंडगे

farmer
शेतकऱ्याला कर्जमाफी देणे, दुष्काळात मदत करणे, नुकसान भरपाई देणे ही सरकारची जबाबदारी असते. सरकार शेतकरी वर्गावर उपकार करत नाही, असे खडेबोल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किसान सेलचे अध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी सरकारला सुनावले. पाथरी येथील शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, याआधीच्या सरकारने आपातकालीन परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत केली आहे. मात्र हे भाजप-शिवसेना सरकार वेगवेगळ्या युक्त्या लढवून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. शेतीमालाचा भाव ठरवणाऱ्या समित्यांना वैधानिक दर्जा देणे गरजेचे आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. किसान मंचच्या वतीने येत्या २ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे भव्य शेतकरी मेळावा पार पडणार आहे. नाशिक येथे होणाऱ्या या मेळाव्याला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शंकरअण्णा धोंडगे यांनी यावेळी केले.


यावर अधिक वाचा :