शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (17:12 IST)

पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा - एकनाथ खडसे

eknath khadse
"तुम्ही 200 कोटी काय 600 कोटी आणले असतील. पण तत्व आणि सत्व शिल्लक राहिले नाहीत. निष्ठा नसेल तर कितीही कोटी आणले तरी त्याला अर्थ नाही. पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी शिंदे गटातील आमदारांवर टीका केली आहे.
 
एका कार्यक्रमात बोलताना खडसे म्हणाले, "पूर्वी निवडणुका विचारांनी लढल्या जायच्या. पण आता सरकार पाडायचं काम चालू आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं घाणेरडं राजकारण कधी झालं नव्हतं."
 
"धनुष्यबाणाच्या जोरावर आणि बाळासाहेबांच्या पुण्याईवर शिवसेनेचे आमदार निवडून आले होते. पण आता त्यांना धोका देऊन तुम्ही शिंदे गटात गेला आहात, हे जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही," असंही खडसे यांनी म्हटलं. ही बातमी लोकमतने दिली.