शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 जुलै 2023 (21:58 IST)

राष्ट्रवादीने व्यवस्थित दबाव टाकला आणि यशस्वी झाले, बच्चू कडू यांची खातेवाटपावर प्रतिक्रिया

bachhu kadu
प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी राज्यमंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने व्यवस्थित दबाव टाकला आणि यशस्वी झाले, अशी प्रतिक्रिया आमदार कडू यांनी दिली. ते ‘एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. खातेवाटपावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, “मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात उशिरा आलेल्या राष्ट्रवादीला झुकतं माप दिलं आहे, असं एकंदरीत दिसतंय. आता जे काही राहिलेले लोक आहेत, त्यांच्या नशिबी काय येईल? हे मला माहीत नाही. आता जे खातेवाटप झालंय, ते अजित पवार यांच्या सोयीनुसार झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने व्यवस्थित दबाब टाकला आणि ते यशस्वी झाले, असं एकंदरीत दिसतंय.”
 
अजित पवारांना अर्थ खातं देण्याबाबत विचारलं असता बच्चू कडू पुढे म्हणाले, “अजित पवारांना अर्थखाते मिळू नये, असं सर्वांचं मत होतं. कारण ज्यावेळी राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता होती. तेव्हा अजित पवारांनी शिवसेनेच्या आमदारांना २५ लाख तर राष्ट्रवादीच्या आमदारांना ९० लाखांचा निधी देण्यात येत होता. पण, आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ते अजित पवारांवर नजर ठेवतील, असं वाटतंय.”

Edited By - Ratnadeep Ranshoor