Widgets Magazine
Widgets Magazine

निलम गोऱ्हे यांना जीवे मारण्याची धमकी

बुधवार, 1 मार्च 2017 (11:02 IST)

neelam gorhe

गेल्या काही दिवसांपासून आपल्याला जीवे मारण्याची धमकी देणारे एसएमएस येत असल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी मुंबईचे पोलीस सहआयुक्त देवेन भारती आणि पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे तक्रार केली आहे. निलम गोऱ्हेंनी दिलेल्या माहितीनुसार 21 फेब्रुवारीला संध्याकाळी त्यांना धमकी देणारा मेसेज आला. त्यानंतर पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे निलम गोऱ्हेंनी फोन बंद केला. मात्र गोऱ्हे यांच्या दुसऱ्या नंबरवर 27 तारखेला पुन्हा धमकीचा मेसेज आला. गोऱ्हेंनी मुख्यमंत्र्यांकडे त्याबाबत तक्रार केली असून त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. निलम गोऱ्हेंनी अद्याप कुणावरही संशय व्यक्त केला नसून, धमकी देणाऱ्याला अटक करण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

वर्ल्ड बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस्टिलिना मुंबई भेटीला

वर्ल्ड बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस्टिलिना जॉर्जिया यांनी मुंबईला भेट देत ...

news

एटीएममधून निघाल्या विना सीरियल नंबरच्या 500च्या नोटा

मध्य प्रदेशच्या दमोह येथे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएममधून विना सीरियल नंबरच्या 500च्या ...

news

मोडी फडणवीस भेट मुंबई बद्दल चर्चा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान मोदींसोबतची बैठक संपली आहे. ...

news

शिवसेनचे गट नेते म्हणून निवड पूर्ण

मुंबई महापालिकेत शिवसेनेचे गटनेते म्हणून यशवंत जाधव यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना ...

Widgets Magazine