रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जुलै 2024 (09:35 IST)

मुंबई महानगर क्षेत्रात होर्डिंगसाठी नवीन धोरण तयार करण्यात येणार - उदय सामंत

uday samant
महाराष्ट्रातील मुंबईत होर्डिंग पडण्याच्या अपघातानंतर राज्य सरकार ने या संदर्भात नवीन धोरण जाहीर केली आहे. 
राज्य सरकारचे मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी विधानसभेत चर्चा दरम्यान ही घोषणा केली.

या धोरणाची अंमलबजावणी विधानपरिषद निवडणुकीची आचार संहिता लागल्यानंतर आणि पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे निकाल जाहीर झाल्यावर होणार. सामंत म्हणाले, घाटकोपर येथे 13 मे रोजी पडलेल्या होर्डिंगची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समिती कडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. या शिवाय महामारीच्या काळात लावलेल्या होर्डिंग्स बाबत मागील सरकार ने घेतलेल्या निर्णयाची चौकशी केली जाणार.

उदय सामंत म्हणाले, घाटकोपर मध्ये होर्डिंग लावण्यासाठी परवानगी घेतली नसून मुंबईत लावलेल्या होर्डिंग्स पैकी काही रेल्वेच्या जमिनीत आहे.  

होर्डिंग प्रकरणाचा मुख्य आरोपी भावेश भिंडे यांचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतचे छायाचित्र असून या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे असे भाजपचे आमदार राम कदम  यांनी आरोप केला आहे. तसेच भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी कोविड महामारीपासून मुंबईत लावण्यात आलेल्या सर्व होर्डिंग्सची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

सोमवारी सभागृहात चर्चा झाली की, मुंबई महानगर प्रदेशांत नियमांना धता धाखवत बेकायदेशीरपणे होर्डिंग लावण्यात येत आहे. घाटकोपर मध्ये या निष्काळजीपणामुळे दोन महिन्यांपूर्वी होर्डिंग पडून झालेल्या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला.   
 
Edited by - Priya Dixit