सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (17:17 IST)

नवनिर्वाचित विधान परिषद सदस्यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ

vidhan
महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य सर्वश्री सतेज उर्फ बंटी पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, राजहंस सिंह, सुनील शिंदे, वसंत खंडेलवाल यांना विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ दिली.
 
यावेळी संसदीय कार्य मंत्री ॲड.अनिल परब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री दिवाकर रावते, विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत विविध पक्षांचे मान्यवर, संबंधित अधिकारी उपस्थित होते.