गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 जुलै 2021 (23:21 IST)

काळजी करण्याचे कारण नाही, जयंत पाटील यांचे ट्विट

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची बैठक अर्धवट सोडून मुंबईतील रुग्णालयात दाखल झाले होते. अस्वस्थ वाटत असल्यामुळे जयंत पाटील यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले होतं. जयंत पाटील यांनी आपली प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही असे ट्विट करुन प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. 
 
दरम्यान जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करुन प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हटल आहे की, “आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सुचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. धन्यवाद” असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.