शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 जुलै 2021 (15:40 IST)

म्हणून कोल्हे यांनी नितीन गडकरींचे आभार मानले

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिल्लीत भेट घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आभार मानले आहेत. पुणे-शिरुर दरम्यान दुमजली पुलाचा एलिव्हेटेड कॉरीडॉर (६७ कि.मी) व चाकण-शिक्रापूर चौपदरी करणासाठी काम केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने निधी मंजूर केला आहे.यामुळे शिरुरमधील नगर रस्त्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे. यानिमित्ताने अमोल कोल्हे यांनी गडकरींची भेट घेऊन आभार मानले.अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
 
अमोल कोल्हे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की,“नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. केंद्र सरकारने पुणे शिरुर रस्त्यावर दुमजली फ्लायओव्हर व तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता चौपदरीकरण यासाठी एकूण ८ हजार २१५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. याबद्दल त्यांचे शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या वतीने आभार मानले”.