शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 जुलै 2017 (17:47 IST)

आता सरपंचांची निवड थेट जनतेमधून होणार

ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड थेट जनतेमधून होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरपंचपदासाठी उभे राहणा-या उमेदवाराला किमान सातवी पास असणे बंधनकारक असेल. सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत ग्राम पंचायतीत निवडून आलेल्या सदस्यांकडे सरपंचाची निवड करण्याचा अधिकार होता. यात ज्या पॅनलकडे बहुमत असायचे त्यांची भूमिका निर्णायक ठरायची. नव्या निर्णयामुळे सरपंच निवडण्याचे सर्वाधिकार जनतेला मिळणार आहेत.