शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (19:48 IST)

भोसरी येथे 13 वर्षीय मुलाने तीन जणांचे प्राण वाचविले

सोमवारी भोसरी येथे दुपारी पिंपरीत तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका मुलाचा बुडून मृत्यू झाला. तर 13 वर्षीय मुलाने तीन जणांचे प्राण वाचविले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. 
 
मरण पावलेल्या मुलाचे नाव सूरज अजय वर्मा असून संदीप भावना डवरी, ओमकार प्रकाश शेवाळे, ऋतुराज प्रकाश शेवाळे या मुलाचे प्राण वाचविण्यात यश मिळाले आहे पण त्यात एकाची प्रकृती गंभीर आहे. म्हैस चारण्यासाठी गेलेल्या आयुष गणेश तापकीर या 13 वर्षांच्या मुलाने बुडत  असलेल्या तिघांचे प्राण वाचविले.
 
घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीपैकी दोघांना वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले.