testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

देशातील सर्वात मोठी कांदा बाजार पेठ सुरु शेतकरी वर्गाला दिलासा

onion
लासलगाव| Last Modified शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 (12:28 IST)
येथील बाजार समितीत
कांदा व भुसार शेतीमालाचे लिलाव पुर्ववत सुरू झाल्याने शेतकरी बांधवांनी सुटकेचा निश्वास टाकला अाहे.शहरावरिल शोककळा संपणार असल्याचे चित्र निर्माण होण्याची आशा वाढीस लागली आहे. ९तारखेपासुन सुरू असलेला अनिश्चिततेचे वातावरण निवळण्यास काही अंशी सुरूवात झाल्याचे चित्र निर्माण झाले अाहे.५००व १हजार रुपयाच्या नोटा चलणातुन रद्द करण्याच्या निर्णयामुळे सर्वत्र निर्माण झालेल्या चलन तुटवड्यामुळे बाजार समित्या ओस पडल्याचे दिसत होते.बाजार समित्याकडे व्यापारी मंडळाने चलन तुटवड्याच्या कारणास्तव बाजारात सहभागी होणार नसल्याचे कारणास्तव बाजार समितीचे कामकाज काही काळ प्रभावित झाले होते.मात्र बाजार समिती व्यवस्थापणाने या संकटावा तोडगा काढीत थेट बँक खात्यात किंवा धनादेशाव्दारे माल विक्रीची रक्कम स्विकारण्याचा प्रर्याय दिला.त्यानसार आज शेतकऱ्यांना शेतमाल विक्री नंतर धनादेशाव्दारे रक्कम देण्यात आली.असे असले तरी काही शेतकरी याबाबत काहीशी नाराजी व्यक्त करीत असल्याचे जाणवले .किरकोळ खर्चासाठी
हजार पाचशे रूपयाचे रोख चलन दिले जावे असे काहीशेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यानी आपली खंत व्यक्त केली.कारण सर्वच शेतकरी वरखर्चासाठी खिशात पैसे ठेवीत नसल्याचे दुगाव येथील शेतकरी सुनिल सोनवणे यानी सागितले तर अनेकांनी थेट बँक खात्यात मालविक्रीचे पैसे जमा करण्याबद्दल समाधान व्यक्त केले.तर कांदा व्यापारी मनोज जैन यांनी शेतमाल व्यापार करणाऱ्यांना काही विषेश सवलत देण्याबाबत सरकारला विनंती केली आहे.
बाजार समितीत मका
कांदा या दोन्ही शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात असुन दिपावलीत बाजार समितीचे काकाज काही ठराविक काळासाठी बंद राहतेच
व नंतर लगोलग हजार पाचशेच्या नोटा रद्द प्रकरणामुळे लासलगाव शहरावर शोककळा पसरली होती बाजार समितीच्या कामकाजामुळे शहरातही चहलपहल वाढली असुन दुकाणदारांच्या चेहऱ्यावर रौनक दिसु लागली आहे .


यावर अधिक वाचा :