शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018 (11:38 IST)

देशी मद्याची दुकाने सकाळी आठ वाजताच उघडा

राज्यातील देशी मद्याची दुकाने सकाळी आठ वाजताच उघडण्याचा फतवा मुख्यमंत्र्यांच्या गृह विभागाने काढला आहे. राज्याच्या गृह विभागाने अधिसूचना जारी करून राज्यातील देशी मद्याची दुकाने सकाळी दहाऐवजी आठ वाजता उघडण्याची परवानगी दिली आहे. पूर्वीच्या नियमांप्रमाणे शहरात देशी मद्याची दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सकाळी दहा ते रात्री बारा अशी होती, तर ग्रामीण भागात सकाळी दहा ते रात्री दहा अशी वेळ होती. मात्र आता ग्रामीण व शहरी भागात सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत देशी मद्याची दुकाने सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे.