1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 मार्च 2020 (16:06 IST)

हे तर जाहीर सभेतील भाषण : फडणीस

maharashtra news
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली. “अर्थसंकल्पाच्या नावाखाली अजित पवार यांनी जाहीर सभेतील भाषण केलं. अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कुठलीही आकडेवारी नव्हती केवळ भाषण होतं. आर्थिक स्थितीचं विश्लेषण नव्हतं” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
“ओपनिग, क्लोजिग बॅलेन्स किती असेल? किती तूट राहील? यातील कुठलीही गोष्ट अर्थसंकल्पामध्ये नव्हती. या अर्थसंकल्पामुळे तूट वाढणार आहे. अर्थसंकल्पामध्ये कुठलही संतुलन नाहीय” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.