बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 मार्च 2020 (12:58 IST)

12 वर्षीय मुलाला घरकाम न केल्याने म्हणून आईनेच चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार

.एकलहरा कॉलनीत राहणाऱ्या 12 वर्षीय मुलाला घरकाम न केल्याने म्हणून आईनेच चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आई वर्षा जितेंद्र चौधरी (रा. एकलहरा कॉलनी, नाशिकरोड) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पीडित मुलगा जयेश चौधरी याच्या फिर्यादीनुसार, तो गेल्या 29 फेब्रुवारी रोजी घर सोडून निघून गेला होता. नाशिकरोड पोलिसांनी दोन दिवसांनी त्यास रेल्वेस्थानकावरून ताब्यात घेतले होते. यासंदर्भात जयेश याने पोलिसांना सांगितले की, घरात झाडणे, पुसणे यासह बाथरुम-संडास घासणे अशी कामे त्यास करावी लागत होती. कामे केली नाही तर त्यास उचटणे गॅसवर गरम करून त्याचे चटके त्यास दिले जात होते. तसेच, त्याची बहिणीलाही सकाळी लवकर उठवून कामे करून घेतली जात होती. त्यामुळे ती उभ्याउभ्याच झोपायची. त्यामुळेतिलाही चटके दिले गेल्याचे त्याने सांगितले.
 
सावत्र आई वर्षा हिच्याविरोधात नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक एस.एस. भालेराव हे करीत आहेत.