आमच्या नितूचा अभ्यास कच्चा आहे; सुषमा अंधारे यांचा नितेश राणे यांना टोला
सुषमा अंधारे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते नितेश राणे यांच्यात मागील काही दिवसांपासून व्हिडीओ वॉर सुरू आहे. दोन्ही नेते एकमेकांचे जुने व्हिडीओ शेअर करत एकमेकांवर टीका करत आहेत. अलीकडेच नितेश राणे यांनी सुषमा अंधारेंचा एक जुना व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये सुषमा अंधारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर टीका करताना दिसत आहेत. यानंतर सुषमा अंधारे आणि नितेश राणे यांच्यात व्हिडीओ वॉर सुरू झाला आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणावर सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुषमा अंधारेंनी नितेश राणेंवर उपरोधिक टोलेबाजी केली आहे. नितेश राणे हा माझा भाचा असून त्याचा अभ्यास कच्चा आहे, ही घरातील गोष्टी आहे, अशी टोलेबाजी अंधारेंनी केली.
नितेश राणेंना उद्देशून सुषमा अंधारे म्हणाल्या, “आमच्यात व्हिडीओ वॉर वगैरे काहीही सुरू नाही. आमच्या नितूचा अभ्यास कच्चा आहे. तो माझा भाचा आहे. त्यामुळे ही घरातली गोष्ट आहे. तो माझा वीस वर्षांपूर्वीचा म्हणजेच माझ्या महाविद्यालयीन काळातील एका वाद-विवाद स्पर्धेतला व्हिडीओ राजकारणासाठी वापरत आहे. त्यामुळे मलाही त्यांचे काही व्हिडीओ दाखवले पाहिजेत.”
Edited By- Ratnadeep Ranshoor