गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

विठ्ठलाची पदस्पर्श दर्शनरांग तीन किमी पेक्षा लांब

पंढरपूर- कार्तिकी एकादशीसाठी सुमारे 2 लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण पंढरी नगरी गजबजून गेली आहे. पंढरीमध्ये भाविकांची गर्दी दिसून येत आहे. कार्तिकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पंढरीत प्रशासनकाडून भाविकांच्या सेवेसाठीची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. यातच विठ्लांच्या पदस्पर्श दर्शनरांगेही मंदिर समितीच्या वतीने स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असल्याचे दिसून आले आहे.
 
सध्या विठ्लांची पदस्पर्श दर्शन रांग पत्राशेडपर्यंत जाऊन पोहोचली आहे. येथेपर्यंत मंदिर समितीच्या वतीने शुद्ध फिल्टर केलेले मिनरल वॉटर भाविकांना देण्याचे काम सुरु आहे. याशिवाय प्रति पन्नास मीटवरवर सूचना फलक देखील लावण्यात आले आहेत. यामधे भाविक सध्या उभा असलेल्या स्थितीपासून विठ्लांचे दर्शत कित दूर आहे या बाबतच्या अंतराचे दर्शक फलक देखील अधोरेखित करण्यात आले आहे.
 
सध्या भाविकांना देण्यात येत असलेल्लया पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याचे पॅन्ड वापरण्यात येत आहेत. यासाठी पाचशे स्वयंसेवक देखील कार्यरत आहेत.