Widgets Magazine
Widgets Magazine

विठूमाऊलीचे आता 24 तास दर्शन घेता येणार

पंढरपूर- आषाढीच्या पार्श्वभूमीवर विठूरायाच्या दर्शनाची आसा ठेवून राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरला येतात. या भाविकांना आपल्या लाडक्या विठूमाऊलीचे आता 24 तास दर्शन घेता येणार आहे.
vitthal
महानैवेद्यानंतर देवाच्या शेजघरातील पलंग बाहेर काढण्यात आला. आषाढी यात्रेचा सोहळा संपेपर्यंत म्हणजे 13 जुलैपर्यंत विठूमाऊली चोबीस तास भाविकांच्या दर्शनासाठी उभी राहणार आहे. विठूरायाच्या काकड्यापासून शेजारती पर्यंतचे सर्व राजोपचार बंद होणार असून सकाळी नैवेद्य, सायंकाळी लिंबूपाणी आणि सकाळी नित्यपूजा एवढेच उपचार देवाले केले जाणार आहेत.
 
व्हीआपी दर्शन बंद
विठू माऊलीच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटर चालत येणार्‍या भाविकांना चांगल्या पद्धतीने दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर समितीने करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील पालख्या पंढरीच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. त्यामुळे आषाढीच्या तोंडावर व्हीआयपी दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र यामुळे तथाकथित व्हीआयपी मंडळीचा सामान्य भाविकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
 
आमदार, खासदार आणि मंत्रालयातून चिठ्या घेऊन येणारे हे व्हीआयपी झटपय दर्शनासाठी गर्दी करीत असल्याने दर्शन रांगेत भाविकांना तासंतास ताटकळत उभे राहावे लागते. यामुळेच 25 जूनपासून सर्वच प्रकारच्या व्हीआयपींसाठी असलेले झटपट दर्शन बंद करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

मुंबई देशातील सर्वांत महागडे शहर

भारताची आर्थिक राजधानी मुंबई हे देशातील सर्वांत महागडे तर जगातील ५७ वे शहर असल्याची ...

news

सर्जिकल स्ट्राइकवर कोणत्याही देशाला शंका नाही : पंतप्रधान

''दहशतवादाला प्रत्युत्तर देताना जेव्हा आम्ही सर्जिकल स्ट्राइक केला त्यावेळी जगाला आमची ...

news

भानोत कुटुंबीय ‘नीरजा’ निर्मात्यांच्या विरोधात कोर्टात

दिवंगत एअर हॉस्टेस नीरजा भानोतचे कुटुंबीय राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘नीरजा’ ...

news

देशात ईदचा उत्साह

संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात ईदचा सण साजरा केला जात आहे.लखनऊ आणि अलाहाबादमध्ये काल ...

Widgets Magazine