सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 जानेवारी 2023 (15:48 IST)

भाजपामध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट

chandrashekhar bavankule
“भाजपा मध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट आहे,” असं मत चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केलं. ते बीडमधील एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शनिवारी (२१ जानेवारी) माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.
 
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “भाजपामध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट आहे. तेच ही बदनामी करत आहेत. कालच्या माझ्या संपूर्ण प्रवासात पंकजा मुंडे माझ्यानंतरच बोलल्या. मी पंकजा मुंडेंना प्रथम स्थान दिलं. ती माझी जबाबदारी आहे, मी काही उपकार केलेले नाहीत.”
 
पंकजा मुंडेंच्या नाराजीच्या चर्चेवर बावनकुळेंची प्रतिक्रिया
दरम्यान, पंकजा मुंडे खरंच नाराज आहेत? या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळेंनी याआधीही प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, “पंकजा मुंडे माझ्याशी रोज बोलतात. माझी आणि त्यांच्याशी परवाच चर्चा झाली. परवा त्यांची प्रकृती ठिक नव्हती. कधीकधी व्यक्तिगत अडचणी येत असतात. एखाद्या कार्यक्रमाला एखादा नेता उपस्थित राहू शकत नाही. प्रत्येक नेत्याची व्यस्तता वेगळी असते. आज देवेंद्र फडणवीस बीडमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून गेले आहेत. त्या कार्यक्रमाला एखादा आमदार नसेल तर त्याने दांड मारली असे म्हणायचे का?”
 
Edited By- Ratnadeep Ranshoor