शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (16:00 IST)

पंकजा मुंडे यांचा निर्धार, मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गळ्यात हार आणि डोक्याला फेटा बांधणार नाही

मराठा समाजाच्या आरक्षणाचा आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्‍न निकाली लागत नाही तोपर्यंत हारतुरे घेणार नाही आणि फेटा ही बांधणार नाही, असा संकल्प भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला. 'जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा  विषय मार्गी लागत नाही तोपर्तंय गळ्यात हार नको. ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तो पर्यंत मला कोणी फेटा बांधायचा नाही, असा निर्धार पंकजा मुंडे  यांनी केली आहे. त्याचवेळी त्या म्हणाल्या, 'बीडमध्ये एक चांगले आणि सुंदर उदाहरण घालून देऊ आरक्षण लढा वेगळ्या मार्गाने उभा करूया.' 
 
यावेळी त्यांनी राजकारणावर भाष्य केले. राजकारण कसे असावे, याचे उदाहरण देताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला दिला. ज्याला खुर्चीवर बसायचे आहे, त्याला आपण आपआपसात भांडून मरावे असे वाटते, पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी असे केले नाही. त्यांनी सोशल इंजिनिअरिंग केले. गोपीनाथ मुंडे यांना मी एकदा विचारले होते तेव्हा त्यांनी शिवाजी महाराज यांचे नाव समोर ठेऊन राजकारण करत असल्याचे सांगितले.