गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (09:35 IST)

पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा विचार करतील?

pankaja munde
पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात होते. तसेच मागील काही काळापासून पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टीत अस्वस्थ असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे.
 
पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील का? याबाबतही स्पष्ट विधान केलं आहे. याबाबत विचारलं असता एकनाथ खडसे म्हणाले, पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत. त्यांनी वर्षानुवर्षे भारतीय जनता पार्टीच्या विस्तारासाठी काम केलं आहे. असं असताना पंकजा मुंडे यांच्यावर भाजपामध्ये अन्याय होत आहे, अशी भावना सातत्याने जनतेमध्ये आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे. त्यामुळे पंकजा मुंडे अस्वस्थ आहेत, अशा प्रकारच्या बातम्याही येतात.”
 
“त्यामुळे स्वाभाविकपणे अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचं आवाहन केलं. राष्ट्रवादीत यायचं की नाही? हा निर्णय पंकजा मुंडे यांनी घ्यायचा आहे. पण त्यांनी वर्षानुवर्षे भाजपाचं काम केलं आहे. त्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा विचार करतील, असं मला वाटतं नाही” असं स्पष्ट विधान एकनाथ खडसे यांनी केलं आहे.