रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 मार्च 2021 (08:32 IST)

संघर्ष पेटणार, गृहमंत्री देशमुखांविरोधात परमबीर सिंग आता थेट सर्वोच्च न्यायालयात

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे. या पत्राद्वारे सिंग यांनी अनिल देशमुखांवर पैसे वसुली करण्याचा आरोप केला आहे. याचसंदर्भातराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन देशमुख यांची पाठराखण केली. देशमुखांवर केलेल्या आरोपात काही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर आता पत्रातील आरोपीची सखोल चौकशी होण्यासाठी परमबीर सिंग यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रातील आरोपाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी मुंबईच माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पत्रात केलेल्या आरोपांची चौकशी निष्पक्षपणे व्हावी, अशी मागणी सिंग यांनी केली आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात कोणतेही आयपीएस अधिकारी बोलतात किंवा त्यांच्याविरोधातील पुरावे सरकारला देतात, तर त्यांची उचलबांगडी केली जाते, अशी माहिती याचिकेत सिंग यांनी नमुद केली आहे.