गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 18 सप्टेंबर 2019 (16:30 IST)

पवारसाहेब तुमच्यावर प्रेम करणारे मावळे सोबत : धनंजय मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेसोबत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, भाजप आमदार सुरेश धस, शिवसेनेकडून मंत्रिपद मिळवलेले जयदत्त क्षीरसागर आणि उदयनराजे भोसले यांच्यावर तुफान टीका केली. “जे कावळे होते ते गेले. मात्र पवारसाहेब तुमच्यावर प्रेम करणारे मावळे सोबत आहेत. छत्रपती उदयनराजे गेल्यानंतर धक्का बसला. छत्रपती पंताला शरण गेले”, असं म्हणत धनंजय मुंडेंनी उदयनराजेंवर सडकून टीका केली. शरद पवारांनी जेवढे विमानतळ बांधले तेवढे बसस्थानक गुजरातमध्ये नाहीत, असं म्हणत त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांना टार्गेट केलं.
 
“शरद पवार साहेबांनी प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांच्यासह अन्य मागासवर्गीय नेत्यांना खुल्या जागेतून आमदार- खासदार केलं. भाजपचं आता विभाजन झाले आहे. ज्या बबनराव पाचपुते यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले, त्यांनाच भाजपात घेऊन पवित्र केलं. मुख्यमंत्री आधी बबन्या म्हणायचे, आता बबनराव पाचपुते असं नाव घेतात”, अशी टोलेबाजी धनंजय मुंडे यांनी केली.