रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 मे 2019 (10:00 IST)

बाप्परे, मल्टीप्लेक्सच्या समोसामध्ये कापडाचा तुकडा

मुंबईतल्या कल्याणमध्ये समोसामध्ये कापडाचा तुकडा आढळला आहे. कल्याणमधील नामांकित एसएम ५ या मल्टीप्लेक्सध्ये ही घटना समोर आली आहे. हा समोसा खाल्ल्यामुळे एका महिलेला उलट्या झाल्या. 
 
या घटनेत प्रतिभा खरात या आपल्या मैत्रिणीसोबत एसएम ५ मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेल्या होत्या. चित्रपटाच्या मध्यांतरात त्यांनी मल्टिप्लेक्समधील स्टॉलवरून तब्बल ९० रुपये देऊन २ समोसे विकत घेतले. त्यातील एक समोसा त्यांनी खाल्ला आणि दुसरा समोसा अर्धा खाऊन होत असताना त्यांना त्यामध्ये कपड्याचा मोठा तुकडा आढळला. तो पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांच्या मैत्रिणीला हा समोसा खाऊन उलट्या झाल्या. दरम्यान, प्रतिभा खरात या महिलेने याबाबत मल्टिप्लेक्स व्यवस्थापनाकडे जाब विचारत  मल्टिप्लेक्समधील कर्मचा-याच्या कानशिलात लगावली.