testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आर्थिक घोटाळेबाज फडणीस एखेर अटक कोट्यवधींची फसवणूक

fadnis
Last Modified गुरूवार, 20 एप्रिल 2017 (20:26 IST)

फडनिस ग्रुप ऑफ़ कंपनीज आणि फडनिस इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून पैसा दाम दुप्पट करणार असे भासवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयाची फसवणुक केलेल्या विनय प्रभाकर फडनिस याला पोलिसांनी विक्रोळी

मुंबई
येथून अटक केली आहे. तर मुंबई नाका पोलिस स्टेशन येथे सुधिर नागेश हिंगे (६५) खोडेनगर यांनी फिर्याद दिली असून त्यांची एकूण १० कोटी ४३ लाख ७२ हजार रुपयांची फडणीस ग्रुप
फसवणूक केली असून मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

फडणीस ग्रुपचे महाराष्ट्रातच 8000 च्या आसपास गुंतवणूकदार असून नाशिकमध्येच 2000 गुंतवणूकदार आहेत. एकूण तब्बल 300 कोटींचा किंवा अधिक रुपयांचा हा घोटाळा उघड झाला आहे.झटपट श्रीमंती साठी अनेकांनी लाखो कोट्यावधी रुपये गुंतवले होते. तर या प्रकरणात जवळपास २०० तक्रारी पोलिसांकडे प्राप्त आहेत.

या प्रकरणात ३०/०९/२०१६ रोजी फडनिस ग्रुप ऑफ़ कंपनीज आणि फडनिस इन्फ्रास्ट्रक्चर विरोधात अनेक
गुंतवणूक केलेल्या नागरिकांनी फिर्याद दिली
होती
त्या अंतर्गत गुरनं २६३/२०१६ ब भादविक ४२०,४०९,४०६, १२० ब
सह
महाराष्ट्र गुंतवणुकदारांचे
हितसंरक्षण

कायदा१९९९
कलम ३ व ४ नुसार गुन्हा
दाखल आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे
शाखा करणार आहे. मुख्य संशयित ताब्यात आल्याने पोलिसांना तपास योग्य पद्धतीने आणि वेगात करता येणार आहे.यावर अधिक वाचा :