शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जुलै 2024 (09:13 IST)

फोनपे वापरकर्त्याची 5 लाख रुपायांची फसवणूक, आरोपींना अटक

महाराष्ट्रातून सायबर फसवणुकीची घटना समोर आली आहे. दहावी पर्यंत शिकलेल्या तीन तरूणांनी एक आयटी कंपनी स्थापित करून मोठी फसवणूक केली आहे. आरोपींची नागपूरच्या एका व्यक्तीची 5 लाखाची फसवणूक केली असून तिघांना मुंबईतून अटक करण्यात आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींची समर्थ आयटी सोल्युशन नावाची कंपनी स्थापन करून या कंपनीची माहिती गुगल ने दिली. 

नागपूरच्या महाल भागातील रहिवासी अतुल उईके यांना मे महिन्यांत मोबाईल वर फोन पे  ॲप चालवताना काही समस्या येत होत्या. त्यांनी कस्टमर केअरशी संपर्क कसा करू शकतो ही माहिती शोधली आणि त्यांना या कंपनीचा नंबर सापडला. कंपनीतील या आरोपींनी व्हिडीओ कॉल करून पीडितच्या मोबाईल मध्ये काही सेटिंग करून रात्री पर्यंत  ॲप सुरू असल्याचा दावा केला.

मात्र पीडितच्या खात्यातून दोन दिवसांत तीन वेळा 5 लाख रुपये काढण्यात आल्याचे त्यांना समजले. त्यांनी सायबर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना मुंबईतून अटक केली आहे.नागपूर सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत

Edited by - Priya Dixit