रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (12:24 IST)

पूजा चव्हाण प्रकरण : अजित पवारांनी केली संजय राठोड यांची पाठराखण

राज्यात पूजा चव्हाण प्रकरणावरुन राजकारण तापलं असून भाजपा वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर मत मांडत संजय राठोड यांच्या बाजूने बोलताना दिसले.
 
पवार म्हणाले की सध्या तरी ती व्यक्ती निराधार असून ही वस्तुस्थिती खऱी आहे. यापूर्वी देखील धनंजय मुंडेंच्या बाबतीत सुद्धा अशाच पद्दतीचे आरोप झाले. तेव्हा माहिती न घेता राजीनामा घेतला असता तर त्यांची बदनामी झाली असती. म्हणून चौकशी होऊन संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत एखाद्याला दोषी समजून किंवा राजीनाम घेऊन पदावरुन हटवायचं हे कितपत योग्य आहे याचा विचार झाला पाहिजे.
 
मात्र संजय राठोड यांनी मात्र अद्यापही या विषयावर मौन बाळगलं असून शिवसेना देखील सध्या काहीही वक्तव्य देत नसल्याचे चित्र आहे.