सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (09:36 IST)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण झाले अधिक गुंतागुंतीचे, पूजा अरुण राठोड या तरुणींने गर्भपात केल्याचे उघड

पुण्याचे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण आता आणखीच गुंतागुंतीचं होताना दिसत आहे. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात पूजा अरुण राठोड या तरुणींने गर्भपात केल्याचे धक्कादायक अहवाल समोर आले आहेत. त्यामुळे पुण्याची पूजा चव्हाण ही गर्भापत केलेली पूजा अरुण राठोड आहे का?, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरुण राठोड या व्यक्तींचा थेट संबंध आला आहे. पण ज्या डॉक्टराने पूजा राठोड तरुणीचा गर्भापात केला होता, तेच डॉक्टर पूजा चव्हाणने आत्महत्या केल्याच्या दिवसापासून गायब झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
 
यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६ फेब्रुवारी रोजी २२ वर्षीय पूजा अरुण राठोड नावाची तरुणी दाखल झाली होती. सकाळी साडे चारच्या सुमारास पूजा अरुण राठोड या रुग्णालयात दाखल झाली असून तिला वॉर्ड क्रमांक ३ मध्ये भरती करण्यात आले होते. पूजा ही गर्भपात करण्यासाठी या रुग्णालयात दाखल झाली होती. गर्भपात झालेला अहवाल उघडकीस असून त्यामुळे याचा संबंध पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण पूजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारीला रात्री दीड वाजता पुण्यात आत्महत्या केली. त्यानंतर या आत्महत्या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड आणि अरुण राठोड या व्यक्तींची नावे समोर आली.