शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 30 जानेवारी 2019 (10:13 IST)

महाआघाडीबाबतची चर्चा निष्फळ

प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर महाआघाडीबाबत झालेली चर्चा निष्पळ ठरली आहे. जवळपास दोन तास चाललेल्या बैठकीतून कोणताच तोडगा निघालेला नाही. आघाडीबाबत चर्चा पुढे सरकली नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे. तर आंबेडकर आघाडीत सहभागी होतील याबाबत आपण आशावादी असल्याचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. 
 
याआधी प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमसोबत निवडणुका लढवणार असल्य़ाची घोषणा केली आहे. काँग्रेससाठी आजही दरवाजे खुले आहेत. असंही त्यांनी म्हटलं होतं. पण काँग्रेसशी युती झाली तरी आम्ही एमआयएमला सोडणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे.