गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

डॉ. प्रकाश आमटे यांना डी.लिट उपाधी

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्राचे आदर्श असे स्वर्गीय बाबा आमटे यांचे सुपुत्र  डॉ. प्रकाश आमटे यांना डी.लिट ही मानाची उपाधी देण्यात येणार आहे, विद्यापीठाने अधिकृत घोषणा  केली आहे.
 
डॉक्टर ऑफ लिटरेचर ही सन्मान्य पदवी प्रदान करणेबाबत ठराव अधिसभेच्या बैठकीत संमत करण्यात आला आहे. विद्यापीठाचे प्रती-कुलपती व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आयांनी सुचवल्याप्रमाणे डॉ.प्रकाश आमटे यांनी डी.लिट. पदवी देण्याबाबत प्रस्ताव कुलपती कार्यालय व व्यवस्थापन परिषदेने संमत केल्यावर अधिसभेत सादर करण्यात आला अशी महिती कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसकर यांनी दिली आहे.
 
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विधायापीठाच्या तिसरया अधिसभेत ७ नोव्हेंबर मुख्यालयात आयोजन केले होते. प्रकाश आमटे यांनी केलेल्या सामाजिक आणि देश प्रबोधन कामांसाठी केलेल्या कामासाठी हा सन्मान महाराष्ट्र करणार आहे.