testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पत्रकार अत्याचार प्रकरण: मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबई - प्रशांत कांबळे आणि अभिजित तिवारी या पत्रकारावर अमरावती पोलिसांनी केलेल्या अत्याचाराविरोधात मुंबई सह राज्यातील सर्व पत्रकारांनी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना सविस्तर निवेदन दिलं होतं. सुधीरभाऊंनी या प्रकरणी विशेष लक्ष घालून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांच्या कानावर हा विषय घातला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब चौकशीचे लिखित आदेश दिलेत. त्यामुळे आता या प्रकरणी चौकशीचा मार्ग मोकळा झालाय.
यापूर्वी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनीसुद्धा हे प्रकरण चौकशीसाठी SC आणि ST
कमिशन कडे सोपवलंय, त्याची सुद्धा चौकशी लवकरच
सुरु होईल. मित्रानो आपण सर्वजण सनदशीर मार्गाने प्रशांत कांबळेसाठी लढा लढतोय. त्याला यश मिळेल असा ठाम विश्वास आम्हाला आहे. हा लढा असाच तेवत ठेवावा लागणार आहे.


यावर अधिक वाचा :