रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 ऑगस्ट 2023 (20:36 IST)

एनडी स्टुडिओ विकत देण्यासाठी ठाकरेंकडून दबाव; नितेश राणेंचा आरोप

nitesh rane
एनडी स्टुडिओचे मालक, प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आता आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे दाम्पत्याला देसाईंचा स्टुडिओ हवा होता. त्यासाठी ठाकरे यांच्या जवळच्या व्यक्तीकडून देसाईंना धमक्या येत होत्या, असा आरोप राणे यांनी केला आहे.
 
राणे म्हणाले, नितीन देसाई आणि माझे संबंध चांगले होते. त्यांनी खूप मेहनतीने स्टुडिओ बनवला होता. त्यांनी काही दिवसांपूर्वीच आपले जीवन संपवले. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. स्टुडिओ विकत द्यावा, म्हणून त्यांच्यावर दबाव होता. तो कोणाचा दबाव होता, हे महाराष्ट्राला समजले पाहिजे. माझ्या माहितीनुसार उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचा देसाईंवर दबाव होता. मातोश्रीशी निगडीत व्यक्ती स्टुडिओ विकत देण्यासाठी देसाईंना धमक्या देत होती.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor