शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जून 2022 (21:43 IST)

मालेगावमध्ये मुस्लीम समाजातर्फे नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी निदर्शने

प्रेषित पैगंबर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांच्याविरुध्द कारवाई करा या मागणीसाठी जामा मस्जिद कमीटी व समस्त मुस्लीम समाजातर्फे उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाही देण्यात आल्या. नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मुस्लीम देशांनी या भडकाऊ विधानाचा निषेध केला.तर भारतातही अनेक मुस्लिम संघटनांनी त्याचा निषेध करत आज आंदोलन केले. याच पार्श्वभूमीवर आज मालेगावमध्ये ही निदर्शने करण्यात आली.