मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (08:44 IST)

पंजाबच्या विद्यार्थीनींचे MMS मुंबईत व्हायरल; पोलिसांकडून एकास अटक

arrest
मोहाली न्यूड व्हिडिओ प्रकरणात आता मुंबईचं नाव समोर आलं आहे. मुंबईत सध्या ६० मुलींचे व्हिडिओ व्हायरल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मोहित नावाच्या संशियताला पोलीसांनी अटक केली आहे. पोलिसांना त्याच्या मोबाईमध्ये काही संशयास्पद स्क्रीनशॉटही मिळाले आहेत. आरोपी विद्यार्थीनी त्याच्या संपर्कात नसतानाही त्याला हे व्हिडिओ मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. याशिवाय हिमाचल प्रदेशातून अटक करण्यात आलेला संशियीत सनीला मुंबई आणि गुजरातमधून अनेक कॉल्स आलेले आहेत. त्यामुळं आता या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्र आणि गुजरातपर्यंत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
या प्रकरणातील मुख्य संशियीत आरोपी विद्यार्थीनीनं तिच्या बॉयफ्रेंडला जे व्हिडिओ पाठवले होते, त्यानंच मलाही सर्व अश्लिल व्हिडिओ पाठवल्याची कबुली आरोपी मोहितनं पोलिसांना दिली आहे. त्यामुळं आता पोलीस सनी आणि मोहित या दोघांना समोरासमोर घेऊन चौकशी करण्याची शक्यता आहे. याशिवाय त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले चार मोबाईल पोलिसांनी फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवले आहेत.