1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

हा तर चार वर्षातील पाप झाकण्याचा हा प्रयत्न : विखे पाटील

maharashtra news
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा शिवसेना पक्षप्रमुख सत्तेत असतानाही अयोध्या, पंढरपूर यानंतर वाराणसी अशा वाऱ्या करून चार वर्षातील आपले पाप झाकण्याचा हा प्रयत्न म्हणजे नौटंकी असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. लासलगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि डॉक्टर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
 
“शेतीमालाला बाजार भाव नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राम मंदिर बांधण्यासाठी गेले हे एक मोठी अडचणीचं काम झाले आहे. राम मंदिर बांधायचे आहे, बांधू आपण, मात्र राज्यात शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे, तरुणांना रोजगार नाही, कर्जमाफी होत नाही, अशातच पंढरपूर येथे उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेत जागावाटप गेली खड्ड्यात अशा सत्तेत राहण्याचे आम्हाला काही स्वारस्य नाही, पण ते सत्तेतूनही बाहेर यायला तयार का नाही?” असा सवाल विखे पाटलांनी केला.