शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 ऑगस्ट 2018 (16:09 IST)

रिक्षाचालक जिद्दीने बनले महापौर, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सत्ता

परी चिंचवड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक घेण्यात आली असून, सत्ताधारी भाजपचे महापौरपदाचे उमेदवार राहुल जाधव यांना 80 मतं मिळाली आहेत. राष्ट्रवादी उमेदवार 33 मतं मिळाली आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक गैरहजर राहिले असून,  भाजपचेही ३ नगरसेवक गैरहजर राहिले. त्यामुळे महापौरपदी भाजपचे राहुल जाधव विजयी झाले. उपमहापौरपदी भाजपच्याच सचिन चिंचवडे यांची निवड झाली आहे. त्यामुळे भाजपा गड राखण्यात यशस्वी झाला आहे. तर सांगली आणि जळगाव येथे नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत भाजपाची पूर्ण सत्ता आली असून, मराठा मोर्चा आणि याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही.
 
महापौर राहुल जाधव यांचा नगरसेवक ते थेट महापौर असा राजकीय कारकिर्दीचा चढता आलेख जरी दिसत असला तरी हा प्रवास त्यांच्यासाठी खूप खडतर होता. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या जाधव यांनी आपल्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी पिंपरी चिंचवड शहरात तब्बल 5 वर्षे रिक्षा चालवलेली असून ते जिद्दीवर आज ते त्यांच्या शहराचे प्रथम नागरिक बनले आहेत.
 
पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्यांनी मनसेला रामराम केला व भाजपमध्ये प्रवेश केला. दादांचे कट्टर पाठीराखे असल्याने लगेच त्यांची स्थायी समितीवर वर्णीही लागली. स्थायीचे अध्यक्ष न झाल्याने त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आता ते पिंपरी चिंचवडचे महापौर म्हणून काम करणार आहेत.