Widgets Magazine

महाराष्ट्रात जोरदार पाऊस; कोल्हापूर येथे महापूर स्थिती

Last Modified शनिवार, 22 जुलै 2017 (14:20 IST)

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने आपला जोर कायम ठेवला असून, अनेक ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूरला तर इतका पाऊस झाला आहे की सर्व वाहतूक बंद झाली असून महापूर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कारवाई करत कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्ग बंद करण्यात आला आहे.सावित्री पुलाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक ब्रिटीशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे.तर पंचगंगा नदी ही धोक्याच्या पातळी जवळ पोहचली आहे.मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस सुरु आहे.यामध्ये

मुलुंड, भांडूप, पवई, घाटकोपर, अंधेरी, मालाड आणि गोरेगाव परिसरात तर ठाणे, कल्याण आणि डोंबिवली परिसरात सुद्धा जोरदार पाऊस सुरु आहे.

नाशिकला गेल्या २४ तासापासून पाऊस सुरु असून अनेक धरणे भरत आली आहेत.त्यामुळे गंगापूर, दारणा आणि नांदूरमध्यमेश्वर या ठिकाणहून पाणी विसर्ग सुरु आहे. कोकणात सुद्धा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गरज नसल्यास बाहेर पडू नका असे प्रशासनाने सांगितले असून सुरक्षित स्थळी राहावे अशी विनंती नागरिकांना केली आहे. येत्या ४८ तासात असून जोरदार पावसाची शक्यता आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे,यावर अधिक वाचा :