शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 एप्रिल 2023 (11:38 IST)

Rain in Maharashtra :राज्यात अवकाळी पाऊस-गारपिटीचा इशारा

cyclone
राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात आज आणि उद्या पुन्हा अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 

राज्यात पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात पावसासह गारपीटचा इशारा देण्यात आला आहे. सध्या राज्याला उन्हाळ्यात पावसाचा धुमाकूळ सुरु असून पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे हंगामी पिकांचे पावसामुळे आणि गारपिटीमुळे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास खराब झाला आहे. विदर्भात गारपीटामुळे नागरिकांना त्रास झाला. 
 
यंदा राज्याला अवकाळी पावसाचा फटका सहन करावा लागत आहे.राज्याला अवकाळी पावसाने झोडपले आहे. द्वीपकल्पात 15 ते 20 अंश अक्षवृत्तादरम्यान हवेच्या उच्च दाबाचे क्षेत्र 2 समुद्राच्या बाजूला टिकून राहिले. जमिनीवर वारा खंडितता व हवेचा निर्वात दाबाच्या आसनिर्मितीमुळे दीड महिन्यापासून अवकाळी वातावरण आहे, असे हवामानतज्ज्ञने सांगितले. 
 
राज्यात गेल्या दीड महिन्यापासून अवकाळी पाऊस आणि गारपीटने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यात उष्णतेची तीव्रतेत वाढ झाली होती.पावसामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसासह वीज कोसळण्याची घटना देखील घडल्यामुळे अनेक जनावरे आणि माणसे दगावले आहे. हवामान खात्यानं येत्या दोन दिवसात पावसाचा आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit